२८ वर्षाचा रुग्ण मेडीलिव्ह हॉस्पिटल ला गंभीर अवस्थेत आला. आधीच बरीच हॉस्पिटल आणि डॉक्टर फिरून आला होता त्याचे निदान झाले नाही आणि उपचार पण होत नव्हता. खूप जास्त पोट दुखणे, ताप, अशक्तपणा, जेवण अजिबात जात नव्हते, वजन (10- 12kg) कमी झाले होते, उलट्या आणि मळमळ ह्या तक्रारी होत्या. पेशंट आल्यावर त्याला ICU मध्ये अडमिट केले. लगेचच symptomatic treatment चालु केली. मग टेस्ट केल्या. रक्ताच्या आणि सोनोग्राफी केल्यावर कळले की त्याला स्वादुपिंडाचा आजार आहे आणि त्यामुळे पोटात पाणी पण झाले आहे. Acute Pancreatitis- with Ascites हे निदान झाले. उपचार चालू झाले. त्यामधे तोंडातून एक tube घातली जी डायरेक्ट jejunum मध्ये जाते. NJ tube. त्यामुळे रुग्णाचे जेवण चालु झाले. हळूहळू उपचारांनी रुग्णाला बरे वाटू लागले. औषधोपचारांनी रुग्णाला पूर्ण बरे वाटले. सहा दिवसांनी रुग्णाला NJ tube सकट डिस्चार्ज केले. १० दिवसांनी फेर तपासणी च्या वेळी ती tube काढून टाकली आता रुग्ण पूर्ण बरा आहे सोनोग्राफी मध्ये आता पोटा तले पाणी पूर्ण गेले आहे जेवण वाढले आहे आणि वजन पण वाढत आहे दुखणे पूर्ण बंद झाले आहे. नातेवाईकांनी डॉ शरद देशमुख यांचे खूप आभार मानले. अशा अनेक गंभीर आजारांवर डॉ शरद देशमुख यांनी मेडीलिव्ह हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार केले आहेत.