Nashik
08048067444
+917038032499

मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये आता 'मोटिलिटी क्लिनिक'

मेडिलिव्ह हॉस्पिटल येथील मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग पचनसंस्थेशी संबंधित हालचाली आणि कार्यातील बिघाडामुळे होणाऱ्या त्रासांवर अचूक निदान व प्रभावी उपचार देण्यासाठी ‘मोटिलिटी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. हे क्लिनिक तज्ज्ञ टीमच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना अॅसिडिटी, सतत पोट फुगणे, पोटात जडपणा, अन्न गिळताना त्रास, छातीत जळजळ, वारंवार ढेकर येणे, मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता, जुलाब, मलावरोध तसेच ‘इरिटेबल बाऊल सिंड्रोम’ सारख्या समस्या वाढताना दिसतात. अशा रुग्णांसाठी मोटिलिटी क्लिनिक उपयुक्त ठरणार आहे. या क्लिनिकमधून रुग्णांचा सल्लामसलत, लक्षणांचे सखोल मूल्यांकन, योग्य तपासण्यांचे नियोजन तसेच वैयक्तिकृत उपचार योजना देण्यात येणार आहे. यावेळी डॉ. मधुली भदाने म्हणाले की, मोटिलिटी डिसऑर्डर्स हे अनेक रुग्णांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतात. योग्य निदान आणि नियोजनबद्ध उपचारांमुळे रुग्णांच्या दैनंदिन जीवनमानात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. डॉ. शरद देशमुख यांनी सांगितले की, मोटिलिटी क्लिनिकमुळे पचनसंस्थेच्या गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये अचूक निदान व प्रभावी उपचार शक्य होणार आहे, रुग्णांना विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णांना सर्वसमावेशक पचनसंस्था उपचार सेवा एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे सांगितले.
 2026-03-23T06:53:38

Keywords

footerhc